अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी, तलासरी
वनई :- वानगाव येथील वनई आणि चंद्रनगर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या स्मशानभूम बुलेट ट्रेन च्या प्रोजेक्ट वाल्यांनी ग्रामस्थांनी परवानगी न घेता स्मशान भूमी उध्वस्त केल्यामुळे त्या गावात त्याच वेळेस एका व्यक्तीचा मयत होऊन 26 तास उलटले तरी सुद्धा अंत्यविधी झाली नाही.कारण केंद्र शासनाचा चालू असलेला बुलेट ट्रेन प्रोजेक्ट तयार करत असताना वानगाव मधील वनई आणि चंद्रनगर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये बुलेट ट्रेन चे काम सुरू असताना ग्रामपंचायत हद्दीत येणारे स्मशानभूमी ग्रामस्थांना न विचारता ग्रामपंचायत कडून कोणतीही परवानगी न घेता तोडून टाकल्यामुळे वनई चंद्रनगर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व ग्रामस्थ संतापलेले असून आज दिनांक 17/10/2023 रोजी कष्टकरी संघटने कडून न विचारता आमची स्मशान भूमी तोडलीच कशी असा जाब विचारात जोरदार आंदोलन करण्यात आले, यावेळेस ला. वनई आणि चंद्रनगर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावकरी आणि वनई,चंद्रनगर ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच श्रीमती कामिनी जनाठे असून उपसरपंच अशोक तल्हा सर्वांकडून प्रशासनाला एक प्रश्न विचारताना दिसून आले ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता आमची स्मशानभूमी तोडली तरी कशी असा प्रश्न निर्माण करत प्रशासनाला जाब विचारलेला आहे.


