सुदर्शन मंडले
ग्रामीण प्रतिनिधी आळेफाटा
आळेफाटा :- शारदीय नवरात्रोत्सव निमित्त आळे या ठिकाणी गावची ग्रामदैवत अंबिकामाता देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने या वर्षी श्री कोल्हापूर या ठिकाणाहून पायी ज्योत आणण्यात आली रविवार दि १५ रोजी दुपारी ३ वाजता आळेफाटा चौकात पायी ज्योतीचे स्वागत करण्यात आले .त्यानंतर संपूर्ण ज्योतीचे गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली .मिरवणुकीत गावातील अनेक महिला वर्ग आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते . सदर ज्योत कोल्हापूर वरून आणण्यासाठी उमाजी नाईक मित्र मंडळ आणि आळे ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले .दर वर्षी प्रमाणे अंबिकामाता देवस्थान ट्रस्ट नवरात्रोत्सव काळात नऊ दिवस अखंड हरिनाम सप्ताह व ग्रामदैवत अंबिकामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा चे आयोजन केले आहॆ .श्रीदुर्गासप्तशती पाठ व देवी माहात्म्य सामुदायिक पारायण सोहळा संपन्न होणार आहॆ सप्ताह काळात नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहॆ . दि १५ पासून दैनंदिन कार्यक्रम रोजी पहाटे ४ते ६ काकडा व अभिषेक सकाळी ६ ते ६: ३० देवीची महा आरती सकाळी ८ते ११ श्री दुर्गासप्तशती पाठ दुपारी१ ते ३ नेमाचे भजन ३ते ६महिलांचे कार्यक्रम सायं ६ते ६:३० देवीची महा आरती सायं ६: ३० हरिपाठ रात्रौ ७ते ९ हरी कीर्तन रात्री ९: ०० महाप्रसाद आणि जागर असा दैनंदिन कार्यक्रम राहिलं .रविवार दि २२रोजी सकाळी १०ते २ वाजेपर्यंत होमहवन व दसरा मंगळवार दि २४ रोजी ९ते ३ कान्होबा काठी पालखी मिरवणूक संपन्न होईल . बुधवार दि २५ रोजी सकाळी ७ वाजता प्रातपुजन सकाळी ९ ते १२वाजता श्री भगवती अंबिका मातेची भव्य मिरवणूक त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम होईल .गुरुवार दि २६रोजी सकाळी ७ वाजता प्रातपुजन ,महा स्नान ,महाअभिषेक दुपारी १२:३० वाजता नामवंत कीर्तनकार ह .भ .प संजय महाराज पाचपोर (अकोला )यांच्या शुभहस्ते श्री भगवती अंबिकामातेची मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम होईल .सदर नवरात्रोत्सव कार्यक्रमासाठी विभागातील ग्रामस्तांनी उपस्थित राहून सहकार्य करावे. असे आवाहन देवस्थान कडून करण्यात आले आहॆ .