सचिन भुसाळे
ग्रामीण प्रतिनिधी डोंगरगाव
उमरखेड तालुका अंतर्गत धनगर समाज बांधवांनी पक्षभेत विसरून समाजाच्या हितासाठी एकवटल्यास धनगर समाजाला अनुसुचीत जमाती चा दाखला मिळण्यास उशीर लागणार नाही अशी ग्वाही विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी १४ आॅक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या धनगर जागर यात्रा ‘ या कार्यक्रमात स्थानिक सजोग भवन येथे समाज मेळाव्यात बोलत होते. या अनुसूचीत जमाती दाखला धनगर समाजाला मिळु नये यासाठी केवळ १० टक्के आदिवासी समाजातील काही जन विरोध करित आहेत याच समाजातील ९० टक्के आदिवासी बांधव या लढ्याला समर्थन देत आहे. ईग्रजाच्या व निजामाच्या विरुद्ध स्वाभिमानाने लढनाऱ्या यशवंतराव होळकरांचे आपण वारसदार असुन याचे भान ठेऊन राज्यकत्याची गुलाम गिरी व हुजरे गिरी न करता कोणीतरी महाराष्ट्राच्या विरोधात गुप्त कटकारस्थाने करित असल्याचे त्यांनी म्हटले परंतु रचनारे घरातच आहेत हे सुप्रिया यांना दिसत नाही टिका शरद पवारांचे नाव न घेता या वेळी त्यानी केली. पंढरपुर- सोलापूर जवळील आळेवाडी येथे हे पर्व अधिक तेवत ठेऊन सरकार ला हे आरक्षण देण्यास भाग पाडल्या साठी हातची कामे सोडुन येत्या २२ आॅक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार असल्याने मोठ्या संख्येने सामील होऊन समाजाची ताकद दाखवावी तसेच आरक्षण मुद्दा दोन महिन्यात न्यायालयात निकालात निघेल असे सुध्दा म्हणालेत. या जागर यात्रा कार्यक्रमाला माजी आमदार अनंतकुमार पाटील, रामराव वडकुते, अॅड माधवराव नाईक, बळवंतराव नाईक, बाबु नाईक, अनदराव चिकने, बीपीन मखळे , गोविंद तास्के, माणिक नाईक , भैया पाटील, प्रदीप भुसाळे, देवराव तांबडे पाटील, सर्जेराव शिदे, विनोद शिदे, सिमा मखळे, सविता चन्द्रे , शिला शिरगिरे,प्रियंका मखळे , हे सर्वजन उपस्थित होते सभेला विदर्भ – मराठवाडयातुन समाज बांधव होते.











