अशोक कराड
प्रतिनिधी ग्रामीण करंजी
पाथर्डी – या कार्यक्रमास राघोहीवरे येथील सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच स्वाभिमानी नागरिक महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा किसन चव्हाण होते , प्रा किसन चव्हाण यांच्या संकल्पनेतुन अवतरलेल्या घोंगडी बैठकीने शेवगाव पाथर्डी तालुक्यातील गोर गरीब कुटुंबांचे तसेच शेतकरी बाधंवांचे अनेक प्रश्न मार्गी लागले अनेक समाजकार्य करणाऱ्या तरुणांनी महीलांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये कुणाच्याही दबावाला बळी न पडता जाहिर प्रवेश केला .जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के म्हणाले की वंचित बहुजन आघाडी म्हणजे परिवर्तनाची नांदी आहे. आपले कोणते काम असेल तर शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करून मार्गी लावण्यात येइल घोंगडी बैठकीने गावातील दहशत, दादागिरी,दबाव संपुष्टात आले देशात जातीपातीचे राजकारण करून भाजपा आरएसएस आपली राजकिय पोळी भाजण्याचे पाप करत आहे अध्यक्षीय भाषणात प्रा किसन चव्हाण यांनी उपस्थितीतांना अतिशय मोलाचे व महत्वपूर्ण मार्गदर्शन केले .व म्हणाले की प्रत्येक गावात सता धाऱ्यांचे टगे आहे. ऐन निवडणुकीच्या काळात हे टगे गावात दबावतंत्रचा व दारु मटन तसेच पैशाचे आमिषदाखवतात या टग्यांना व सत्ताधार्यांना सर्व समाज बाधवांनी भीक घालु नये येणार्या सर्व निवडणुकी मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेद्वारास मतदान करावे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे दमदार नेतृत्व आम्हाला मिळालेले आहे प्रकाश आंबेडकर यांच्या झजांवती विराट
सभांमुळे धाबे दणानले आहे सध्या सत्ताधारी सैरबैर झालेले आहे .या कार्यक्रमास प्रामुख्याने पाथर्डीचे सामाजिक कार्यकर्ते सुखदेव मर्दाने, शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई,राजंणी ग्राम पंचायत सदस्य योगेश गवळी, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कर्डीले,शेख सलीम जिलाणी, किशोर नरवडे,अरविंद साळवे, रमेश गायकवाड,दत्तू नरवडे,योसेफ गायकवाड, नामदेव सुर्यवंशी, सुदाम नरवडे यांच्यासह महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या ,शाखा अध्यक्ष पदी अशोक नरवडे , उपाध्यक्ष कैलास गायकवाड, सचिव प्रकाश नरवडे कार्याध्यक्ष विलास गायकवाड, गोविंद नरवडे, सचिन नरवडे,आकाश नरवडे,वामन नरवडे, सोमनाथ नरवडे, सागर नरवडे यांची संघटक पदी निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुखदेव मर्दाने यांनी केले .तर सर्व उपस्थितांचे आभार किशोर नरवडे यांनी व्यक्त केले.