अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मेडशी गावाची लोकसंख्या खूप जास्त असून हे गांव अकोला नांदेड महामार्गावर आहे.येथे नेहमीच वर्दळ असते.तसेच येथे पोलिस चौकी आहे. सदर पोलिस चौकी मध्ये सुशोभीकरणचे काम करण्याचा निर्णय मालेगांव पोलिस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांनी घेतला असून त्या अनुषंगाने मेडशी चौकी मध्ये वृक्ष लागवड,पेवर ब्लॉक, रंगरंगोटी सह अनेक कामे या कालावधीत पार पडली.त्याच पार्श्वभूमीवर मेडशी पोलिस चौकीमध्ये मानवंदना नवीन मंचाचे उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.व युद्ध पातळीवर काम करत उभारण्यात आले.त्यामुळे आज दि 16 ऑक्टेंबर रोजी वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह ह्यांच्या हस्ते सदर नव्याने व अतीशय उत्कृष्ट अश्या मानवंदना मंचाचे उद्धाटन झाले.या वेळी श्री बच्चन सिंह यांनी गावातील सण हे उत्साहात व कायद्याच्या चौकटीत राहून साजरे करा असे आव्हान केले.या कार्यक्रमाच्या वेळी पोलिस विभागाच्या वतीने श्री सुनील पुजारी उपविभागीय पोलिस अधिकारी,श्री दत्तात्रय आव्हाळे पोलिस निरीक्षक,श्री स्वप्नील तायडे सहायक्क पोलिस निरीक्षक,श्री निलेश आहिर पोलिस हेड कॉन्स्टेबल, ज्ञानेश्वर सानाप पोलिस शिपाई, श्री केशव गोडघासे पोलिस शिपाई ह्यांच्या सह जिल्हातील पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच गावातील तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव साठे,शौकत पठाण,पंचायत समिती सदस्या कौसल्याबाई साठे,पोलिस पाटील अनिता चोटमल ह्यांचा सह गावातील प्रदीप पाठक,शेख रज्जाक भाई,घनश्याम साठे, महेबुब रेघिवाले, अभिजित मेडशीकर,अजय चोथमल, वैभव तायडे, संदिप डाखोरे,बबलू जाधव, प्रशांत मेडशीकर,विठ्ठल भागवत,सचिन साठे,सोहेल पठाण,अजिंक्य मेडशीकर सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू मुसळे यांनी केली तर आभार प्रदर्शन राजू महाले यांनी केले.