वैभव गुजरकर
ग्रामीण प्रतिनिधी अकोट
सावरा:- अकोट तालुक्यातील सावरा येथे अमरावती दर्यापूर मार्गे आलेल्या भा ज पा ओबीसी जागर यात्रेचे सावरा ग्रामवासियांनी व भा ज पा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले वर्धा जिल्ह्यालीत पार्डी येथून निघालेली जागर यात्रा पोहरादेवी येथे विसर्जित होणार असून अकोट कडे जात असताना सावरा या गावी फटाक्याच्या अतिसबाजीत भाजपा ओबीसी जागर यात्रेचे महाराष्ट्र ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते मा आमदार आशिष देशमुख, अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे, महाराष्ट्र ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष नारायणराव गव्हाणकर, विशाल गणगणे, डॉ अशोक ओळबे, व भाजपा ओबीसी पधादिकार्यांचे पुष्प हाराने स्वागत करण्यात आले ओबीसी च्या न्याय हक्क कसाठी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी विविध योजना राबविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार यांनी महाराष्ट्र मध्ये ओबीसी च्या जनजागृती करिता भाजपा ओबीसी जागर यात्रेचे आयोजन केले असून ह्या योजना जण सामान्या करिता ओबीसी जागर यात्रेचे सावरा बस स्टॅन्ड वर स्वागत करण्यात आले या मध्ये भाजपा चे अकोट विधानसभा प्रमुख राजेश रावणकर, डॉ. गजानन महल्ले,विठ्ठलराव गुजरकर अजाबराव मोकळकर, दत्तात्रय चौधरी, नितीन टोलमारे, नितीन महल्ले, मोहन काळे, राजू चावके, वैभव गुजरकर, कैलास टोलमारे दिगंबर सपकाळ संजय पाचडे विलास खालोकार राजु पोटकटारे बाळासाहेब गणेश जवंजाळ विठ्ठल ठाकरे राम जवंजाळ, रणजित टोलमारे गजानन राऊत ई भाजपा कार्यकर्त्यांनी स्वागत केले व सोयाबीन कपाशी पिके कमी पावसामुळे उध्वस्त झाली असून करिता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माननीय आमदार प्रकाश भाऊ भारसाकळे यांना निवेदन सादर करण्यात आले ओबीसी प्रमाणेच शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळावी अशी गावकऱ्यांनी अशा व्यक्त केली आणि यात्रा अकोट मार्गे रवाना झाली