सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम:- येथून जवळच असलेल्या अनसिंग येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनाकरिता अनसिंग लगतच्या वीस ते पंचवीस गावातील भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात अनसिंग येथे दर्शनाकरिता येणाऱ्या भाविक भक्तांसाठी अनसिंग फाटा येथे साबुदाणा खिचडी चे वाटप करण्यात आले सदर धार्मिक कार्यात रतन ढगे (पिंटू) संतोष दंडे, गोपाल दंडे, सदाशिव ढगे, गजानन सातव, राजू जंबूरे, किशोर मोदानी, गणेश वारे, अर्जुन ढगे, भिवबा ढगे व रामदास चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले