महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती,दि.१९:-ताडोबा अभयारण्यातील भद्रावती तालुक्यातील घोसरी गावाजवळ पट्टेदार वाघ आज दि.१९ जुलै रोजी मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.प्राप्त माहितीनुसार आज दि.१९ जुलै रोजी दुपारी २ वाजता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील घोसरी गावाजवळ तामसी संरक्षित जंगलात तामसी तलावाजवळ एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. सदर वाघ नर जातीचा असून दीड वर्षे वयाचा आहे. वन अधिका-यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन वाघाचे प्रेत शव विच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठविले. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन केले जाणार आहे. कोअर झोनचे उपसंचालक आणि इतर अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली वाघाच्या मृत्यूचा शोध घेतला जात आहे.


