भागवत नांदणे
सर्कल प्रतिनिधी वरवट बकाल
संग्रामपूर : शासकीय नोकरीसाठी अर्ज भरताना अवाच्या ढवा परीक्षा शुल्क तथा प्रोसेसिंग फी शासनाकडून घेण्यात येत आहे. या अवाढव्य शुल्कामुळे भटक्या विमुक्त जाती- जमातीतील गरीब उमेदवार अर्ज भरू शकत नाही. त्यामुळे नेमक्या याच प्रवर्गातील सुशिक्षि शासकीय नोकऱ्यांपासून वंचित राहत आहे. त्यामुळे या प्रवर्गासाठी शासनाने परीक्षा शुल्क माफ करावे, अशी मागणी निषाद पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे. सध्या शासनाच्या विविध जागांसाठी नोकरभरती सुरू आहे. भटक्या विमुक्त जाती- जमातीसाठी इतरांच्या तुलनेत अत्यल्प आरक्षण असल्यामुळे अगोदरच शासकीय नौकरी पासून वंचित आहे. कमी आरक्षणामुळे या प्रवर्गाला शासन निर्णया मध्ये कमी जागा मिळतात, त्यातही परीक्षा शुल्क अवाच्या ढवा असल्यामुळे सुशिक्षित युवक नोकरीचे अर्ज भरू शकत नाही. त्यामुळे शासनाने या प्रवर्गासाठी परीक्षा फी तसेच अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची इतर फी माफ करावी, अशी मागणी निषाद पार्टीचे प्रदेश आय टी सेल अंकुश कुरवाळे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष देवानंद आमझरे,युवा जिल्हा अध्यक्ष मारोती बोरवार,जिल्हा संयोजक रमेश नांदणे,जिल्हा कार्याध्यश विजय आमझरे, तालुका अध्यक्ष श्रीक्रृष्ण आमझरे, अविनाश नांदणे यांच्या वतीने मागणी करण्यात आली, यासंदर्भात तहसील कार्यालय संग्रामपूर येथे दि.21/08/2023 रोजी निषाद पार्टी च्या वतीने निवेदन देण्यात आले.


