शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : सेलू तालुका विकास कृती समितीच्या वतीने शहरासह तालुक्यातील प्रलंबित विकास कामांचा आढावा घेत प्रश्न मार्गी लावण्यासाठी गुरुवार ता. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता साईबाबा बँकेच्या सभागृहात बैठक संपंन्न झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृती समितीचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, चंद्रशेखर मुळावेकर,जेष्ठ पत्रकार डिगंबर मुळे,अरविंद बोराडे, विलास मोरे, भगवानराव आकात, रघुनाथ बागल,मुश्ताक रब्बानी, शेख रफीक, शेख खाजा, विजय मंत्री, शिवाजी गजमल, पद्माकर कुलकर्णी, दत्तुसिंग ठाकुर, पुनमचंद खोना, उद्धव पौळ आदी उपस्थित होते.यावेळी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यां- समोर गंभीर प्रश्न ऊभे आहेत, औद्योगिक वसाहत, १३२ के.व्ही. केंद्र, धरणाचे पाणी वाटपाचे नियोजन, नागरीकांना वाळू पुरवठा, रेल्वे फाटकानजीक उड्डाण पुल, महावितरणचे प्रश्न आदी प्रलंबित विकास कामांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. सर्व प्रलंबित प्रश्नांना गती देऊन ते मार्गी लावण्यासाठी सेलू तालुका विकास कृती समितीचे पदाधिकारी येत्या २७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून साकडे घालणार आहेत.