मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
अहमदनगर : कांद्याचे निर्यात शुल्क रद्द करण्याच्या मागणीच्या पाठपुराव्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांसमवेत सोमवारी बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये केंद्र सरकारच्या जाचक निर्णय याच्या प्रतिकात्मक आदेशाची होळी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी तालुक्यातील कांदा खरेदीदारांनी कांद्याचे लिलाव बेमुदत बंद करण्याच्या मागणीचे निवेदन खरेदीदारांना दिले.यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या केंद्र सरकारच्या विरोधात केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झालेले आहे.एप्रिल महिन्यात तालुक्याच्या काही भागात झालेली अतिवृष्टी व त्यानंतर यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात कमी प्रमाणात झालेला पाऊस त्यामुळे कांद्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे काही प्रमाणात चांगला भाव मिळून त्याचा लाभ मिळण्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुरुवात झालेली असताना केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढवल्याने त्याचा फटका थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसण्यास सुरुवात झाली आहे.परिणामी कांद्याचे भाव कोसळले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून कांद्याची लागवड केली.त्याची निगा ठेवली. मात्र ऐन वेळेस भाव कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तसेच विविध समस्यांचा सामना करण्याची वेळ आली आहे. नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी घोडेगाव कांद्याच्या बाजारात बाजार समित्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात कांदा खरेदी विक्री बंद आंदोलन पुकारले आहे. त्याच धर्तीवर बाजार समिती शेवगाव बाजार समिती व बाजार समितीच्या प्रांगणातील कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम पणाने उभे राहून कांदा खरेदी विक्री बंद ठेवावी. अशी मागणी करणारे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने बाजार समितीकडे देण्यात आले.या वेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे ,संतोष गायकवाड ,मधुकर पाटेकर यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या आंदोलनात तालुक्यातील, बाळासाहेब तेलोरे ,संतोष घाडगे, अक्षय लेंडाळ ,कांदा खरेदीदार व्यापारी संघटनेचे बापूसाहेब गवळी, राजेंद्र आवटी यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. बाजार समितीचे सचिव अविनाश मस्के यांनी निवेदन स्वीकारले व्यापारी संघटनेचे गवळी यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीबाबत व्यापारी संघटना सहमत असून इतर ठिकाणच्या बाजार समितीकडून माहिती घेऊन बाजार समितीच्या प्रांगणात कांदा खरेदी विक्री बाबत शेतकऱ्यांच्या बाजूने योग्य तो निर्णय तातडीने घेण्यात येईल.असे त्यांनी सुचित केले याबाबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्काबाबत योग्य निर्णय झाला नाही.तर पुकारलेले शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष फुंदे यांनी जाहीर केला.