सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
परळी वै : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यामधील कन्हेरवाडी गावचे स्वस्त धान्य राशन दुकानदार संजय फुलचंद मुंडे यांच्या उपक्रमाने परिसरातील तांड्यावर आणि वस्त्यांमध्ये राहणाऱ्या वयोवृद्धांना मिळते घरपोच राशन. परळी वैजनाथ तालुक्यातील कन्हेरवाडी गावापासून २ किलो मिटर अंतरावर असणाऱ्या तांड्यावर बंजारा समाजाची वस्ती असून या वस्तीत अनेक वयोवृद्ध नागरिक राहतात त्यांना एवढं अंतर चालून कन्हेरवाडी येथील स्वस्त धान्य दुकानावर येणे होत नसल्याने कन्हेरवाडी गावचे स्वस्त धान्य दुकानदार संजय फुलचंद मुंडे हे स्वतः या तांड्यावर जाऊन येथील नागरिकांच्या बोटांचे ठसे घेतात आणि तांड्यावरील तरूणांच्या मदतीने त्यांना घरपोच राशन देतात. यामुळे तांड्यावरील वयोवृद्ध गटातील नागरिकांनाची होणारी गैरसोय आणि हेळसांड थांबली आहे. त्यांच्या उपक्रमाणे बंजारा समाजातील वयोवृद्ध नागरिक त्यांचे कौतुक करत आहेत.


