महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी, भद्रावती
भद्रावती,दि.२०:-येथील भद्रनाग मंदीर कमिटीतर्फे येथील भद्रनाग मंदिरात नागपंचमी निमित्य एक दिवसीय यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले
आहे.दि.२१ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता मंदीर कमिटीचे कोषाध्यक्ष मधुकर सहारे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा करण्यात येणार आहे. यावेळी कमेटीचे अध्यक्ष डॉ.रमेश मिलमिले, उपाध्यक्ष योगेश पांडे तसेच कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. सकाळी ६ वाजतापासून भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. नागपंचमी यात्रेनिमित्य मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.तसेच मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्क्रीन लावण्यात आले आहे. सर्व भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे, याकरिता पोलिस आणि स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवेशासाठी पुरुषांची वेगळी रांग व महिलांची वेगळी रांग राहणार आहे. यात्रा शांततेत पार पडावी याकरिता ८ अधिकारी आणि ६० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. जुन्या बस स्थानकावर बॅरिकेटस् लावण्यात येणार आहे.
जुने बस स्थानक ते नाग मंदीरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा खाद्यपदार्थ, खेळणी, पूजा साहित्य आणि इतर वस्तुंची दुकाने उभारण्यात येणार आहे.खाद्यपदार्थ झाकून ठेवावे-ग्राहक पंचायत दरम्यान, या यात्रेत अनेक दुकानदार प्रसाद, खाद्यपदार्थ तसेच नाश्ता विक्री करतात. परंतु पावसाचे दिवस असल्याने माशा, डास यासारखे जीवजंतू खाद्यपदार्थावर बसतात त्यामुळे भाविकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी सर्व खाद्यपदार्थ झाकून ठेवावे,असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण चिमूरकर यांनी केले आहे.


