सुदर्शन मंडले
ग्रामीण प्रतिनिधी, आळेफाटा
ग्रीन व्हिजन फाउंडेशनने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत १५ ऑगस्ट रोजी ओतूर क्रीडा संकुलात १०० विविध झाडांची लागवड केली आणि त्याचे जतन करण्याची जबाबदारी देखील घेतली. त्यामुळे सर्व सोयी सुविधा युक्त क्रीडा संकुलाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली. या वृक्षारोपण कार्यक्रमाला विविध मान्यवरांसोबत आवर्जून उपस्थित राहत ग्रीन व्हिजनच्या कार्याचे कौतुक सर्वांनी केले.