अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी तलासरी
तलासरी : दि. 20 ऑगस्ट फेसबुक वरून रेल्वेत भरतीचे आमिष दाखवून तरुण – तरुनींची फसवूनक करणाऱ्या तीन आरोपीना अटक करण्यात कासा पोलिसांना अखेर यश, सध्या बेरोजगार वाढीमुळे असा बेरोजगार तरुण – तरुणींना मोठा प्रमाणात Social मीडिया चा वापर करून फसवणूक करणाऱ्याचा संख्या ही सध्या मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. काय आहे मोडस ऑपरेंडी?
मुख्य आरोपी दीपक किशोर दर्शन हा बोईसर येथील रहिवासी आहे. तो फेसबुकवरुन तरुण-तरुणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा. रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर काही दिवसांनी आरोपी त्यांना रेल्वे विभागात नोकरी लावून देतो असे सांगायचे. नोकरीसाठी लाखों रुपये त्यांच्याकडून उकळायचा. डहाणूतील तरुणीचीही अशाच प्रकारे फसवणूक करण्यात आली होती. नोकरी लावण्यासाठी योगिता चौधरी या तरुणीकडून चार लाख रुपये उकळले होते. योगितासह अन्य तिघांकडूनही अशाच प्रकारे चार-चार लाख रुपये उकळले होते.पैसे घेतल्यानंतर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. त्यानंतर आरोपीचा फोन बंद झाला. आपली फसवूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने कासा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप नागरे यांनी प्रकरणाचा तपास केला. गुप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपी दीपकला नाशिकमधून सापळा रचून अटक केली. तर विवेक कुमार कैलास चंद्र आणि राहुल प्यारेलाल पाल या दोघांना उत्तर प्रदेशातून सापळा रचत अटक केली आहे.


