प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.१९ ऑगस्ट पाथरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्याविरुद्ध अपशब्द वापरून भाषण केल्यामुळे पाथरी पोलीस स्टेशन येथे मुजाहिद खान अहमद अली खान यांच्या विरुद्ध अमोल भाले पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीकडच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान ,राष्ट्रपती ,मुख्यमंत्री, अशा संविधानिक पदे असणाऱ्या मोठ्या व्यक्तीबद्दल अपशब्द वापरून किंवा त्यांच्याविरुद्ध पोस्ट शोषण मीडियावर टाकून स्वतःकडे लक्ष आकर्षित करण्याचे प्रकार वाढले आहेत. काल पाथरी येथे राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांच्या विकास निधीतून करण्यात येणाऱ्या एकता नगर येथील सिमेंट रोड भूमिपूजन प्रसंगी एकता नगर येथील नगर परिषदेच्या फंक्शन हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुजाहिद खान अहमद अली खान यांनी देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध भाषण करत असताना ते जातीयवादी असल्याचे बोलून या घटनात्मक संविधानिक पदाधिकाऱ्यांचा अपमान केला असल्याकारणाने त्यांच्याविरुद्ध पाथरी पोलीस स्टेशन येथे अमोल भाले पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.