राजेंद्र पोटफोडे
ग्रामीण प्रतिनिधी, अमरापूर
आज मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी अमरापूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमरापूर ग्रामपंचायतचे सदस्य कॉम्रेड रामजी पोटफोडे हे लाभले होते,त्यांच्या हस्ते विद्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक अशोक जाधव यांनी केले. विद्यालयातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी कवायतीचे सादरीकरण केले. कवायतीसाठी संस्थेचे संस्था प्रतिनिधी श्री शशिकांत काकडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.विद्यालयाचे प्राचार्य गणपत शेलार यांनी त्यांच्या संदेशामध्ये देशाकडून आपल्याला काय मिळतं यापेक्षा देशाला आपण काय देऊ शकतो याचा विचार आजच्या पिढीने केला पाहिजे असे मत व्यक्त केले.तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कॉम्रेड रामजी पोटफोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारताच्या थोर सेनानींनी क्रांतिकारकांनी देश स्वतंत्र होण्यासाठी दिलेले योगदान विशद केले. इयत्ता बारावी विज्ञान ची विद्यार्थिनी कुमारी साक्षी बोरुडे हिने आपले मनोगत व्यक्त केले.आजच्या कार्यक्रमाला अमरापूर गावातील मान्यवर राजू नाना पोटफोडे धनंजय खैरे सचिन खैरे माजी सरपंच विजय पोटफोडे नामदेव तुपे वांढेकर मामा लक्ष्मण बोरुडे सर राजू फलके अशोक चौधरी श्री रामदास तुपे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.आजच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालन जुनिअर कॉलेजचे ज्येष्ठ प्राध्यापक ज्ञानेश्वर आवरे यांनी केले. आजच्या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.