भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव: शिक्षणासोबतच नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे तसेच अहमदनगर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले बोधेगाव येथील आबासाहेब काकडे फार्मसी कॅम्पस मध्ये 77 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी जनशक्ती विकास आघाडी शेवगाव पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक गर्जे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तसेच आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण बिटाळ,बोधेगाव चे ज्येष्ठ नागरिक गहिनीनाथ बडे मामा, गुलाबराव दसपुते, के टी टेलर,बाबा झांबरे,राधाकिसन शिंदे, शेटे टेलर,भागवत भोसले,गणेश उगले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश मोकाटे यांनी केले.अध्यक्षीय भाषणामध्ये माणिकराव गर्जे यांनी सांगितले की भगतसिंग,राजगुरू, नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्याकरता प्राणाची आहुती दिली आज आपणास प्राणाची आहुती देण्याची गरज नाही पण आपण ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात आपले पद उच्चस्त करण्याकरता आपण ध्येयवेडे झाले पाहिजे तरच आपली प्रगती होईल असे प्रतिपादन करून त्यांनी विद्यार्थ्यांना 77व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तसेंच लक्ष्मणराव बिटाळ यांनी सांगितले की आपला देश सुजलाम सुफलाम करण्याकरिता आजच्या युवकांनी पुढे यावे व आपल्या देशाच्या प्रगतीस हातभार लावावा, आपली शैक्षणिक प्रगती उंचावर न्यावी असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संदीप खंडागळे व प्रा आहेर पुजा यांनी केले.कार्यक्रमास डी फार्मसी,बी. फार्मसी चे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.