विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर : तालुक्यातील कुंभारगाव येथील महिला सरपंच उज्वला दत्तात्रय परदेशी यांनी आपल्याला मिळालेल्या मानधनातून गावातील 130 महिलांना अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनाचा योग घडवून आणला आहे. रविवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी एसटी महामंडळाच्या तीन बसने 130 महिला अक्कलकोट रवाना झाल्या. सरपंच उज्वला परदेशी यांनी संपूर्ण खर्च स्वतःच्या मानधनातून केल्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे सरपंच परदेशी या नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर आसतात सरपंच परदेशी यांच्या आदर्श इतर गावातील सरपंचांनी घ्यावा अशा प्रकारची चर्चा सध्या सर्वत्र ऐकवायला मिळत आहे. दर्शनासाठी गेलेल्या सर्व महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.











