सुनिल गेडाम
तालुका प्रतिनिधी सिंदेवाही
लाडबोरी : शासन स्वातंत्राच्या 75 अमृत महोत्सव देशात साजरा करीत आहे, पण या अमृत महोत्सव मध्ये स्थानिक प्रशासन व शासकीय प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आज लाडबोरी गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मधील विध्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची शोकांतिका आहे,जिल्हा परिषद चंद्रपूर मधुन 10% टक्के निधीतून ग्राम पंचायत ला ऐरो मशीन मिळाली आहे,ही मशीन ग्राम पंचायत मध्ये 7 ते 8 महिने बुजागवण्यासारखी आवारात उभी होती पण या ऐरो मशीन लावण्याचे प्रयत्न कुणी करीत नसल्याने स्थानिक पत्रकाराने या बाबत वृत्त प्रकाशित केले,वृत्त प्रकाशित झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाला जाग आली व ही ऐरो मशीन ग्राम पंचायत च्या आवरातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मध्ये आणण्यात आली 7 ते 8 बेवारस पणे ठेवलेल्या या अरो मशीनाचा उपयोग विध्यार्थ्यांना होईल अस वाटल होत,पण दुर्दवाने ही अरो मशीन आजही शाळेत फक्त शोभेची वस्तू बनून आहे,ऐरो मशीन सुरु नसल्याने आजच्या स्थितीत शाळे मधील संपूर्ण विध्यार्थी घरूनच पाणी घेऊन येत असतात आणी मग जवळचे पाणी संपले की पुन्हा घरी पाणी आणायला जात असतात काही काही विध्यार्थ्यांचे घर दूर असल्याने त्यांना मुख्य मार्ग ओलांडून पाण्यासाठी मधातच
घरी जावं लागत, पण स्थानिक प्रशासन ला या गावातील शालेय विध्यार्थ्यांना होत असलेल्या पिण्याच्या पाण्या त्रासाबाबत कोणतीही संवेदना नाही,सध्या पावसाळ्या चे दिवस असून पिण्याच्या अशुद्ध पाण्यामुळे किती मूल आजारी पडतील याच्याशी सुद्धा प्रशासांनाच काही घेणं नसल्यासारखं विध्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्या पासून वंचित ठेवत आहे,सत्ताधाऱ्याच्या जरी शाळेतील मुला प्रती संवेदना संपल्या असतील तरी संपूर्ण बहिऱ्या प्रशासनाला जाग करण्यासाठी विध्यार्थ्यां शाळा व्यवस्थापन समिती च्या सदस्या मार्फत शुद्ध पाणी मिळावे या साठी दिनांक 17 /08/ 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता पासून जिल्हा परिषद शाळेच्या गेट वर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे,विदयार्थ्यांना शुद्ध पाणी शाळेत मिळावे साठी हे आंदोलन करावे लागते ही स्थानिक प्रशासन व शासकीय प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे,








