मधुकर केदार जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी शेवगाव तालुक्यातील श्री संत वामनभाऊ विद्यालय, वडुले खुर्द येथील इयत्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या कु. अश्विनी आजिनाथ गर्जे या विद्यार्थिनीला चार जणांच्या टोळीने फुस लावून पळून नेण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी 4.45 वाजता शाळा सुटल्यानंतर कु. अश्विनी गर्जे गावाबाहेर असणाऱ्या आपल्या घराकडे जात असताना एक पुरुष व तीन महिलांच्या टोळीने स्विफ्ट डिझायर MH 16 -1822 या गाडीमध्ये येऊन बळजबरीने बसवण्याचा प्रयत्न केला. अगोदर आजूबाजूला कोणीही नाही हे पाहून यातील एका महिलेने गाडीच्या खाली उतरून अश्विनी हीस आपल्याला पंढरपूरला जायचं आहे, तुझ्या वडिलांनी तसं आमच्याजवळ सांगितलं आहे,तू आमच्याबरोबर गाडीत बस, असं म्हणून गाडीत ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिला खाऊच्या पुड्याचे आमीशही दाखवले परंतु यावेळी कु. अश्विनी गर्जे हिने प्रतिकार केला असता त्यांनी अश्विनीच्या तोंडाला रुमाल बांधला. तरीसुद्धा छोट्याशा अश्विनीने समय सूचकता ओळखून तोंडाचा रुमाल काढून व हाताला हिसका देऊन पळण्याचा प्रयत्न केला. टोळीतील तीन महिलांनी पुन्हा तिचा पाठलाग करून अश्विनी ला पकडण्याचा प्रयत्न केला असता अश्विनीने रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्याशा झाडाला कवळ घातली. यावेळी झालेल्या झटापटीत अश्विनीला किरकोळ खरचटले देखील आहे. त्याचवेळी रस्त्याने पाठीमागून कोणीतरी येत आहे हे पाहिल्यावर चौघेही गाडीमध्ये बसून आव्हाने रस्त्याने पळून गेले. तत्पूर्वी त्या टोळीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडुले खुर्द येथील इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या कु. चैतन्य सुनील आव्हाड हिला सुद्धा रस्त्याने जाताना फुस लावून गाडीमध्ये ओढून पळून नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता
छोट्याशा कु .अश्विनी हिने दाखवलेल्या धाडसाने व केलेल्या प्रतिकारामुळे तिने स्वतःचे प्राण वाचवले. ही घटना वाऱ्यासारखी गावामध्ये समजतात अनेकांनी तिचे घरी जाऊन कौतुक केले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 ऑगस्ट 2023 रोजी विद्यालय व वडुले खुर्द ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांसमोर सत्कार करण्यात आला .
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा किसन चव्हाण यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना घाबरून न जाता सतर्क राहण्याच्या तसेच अनोळखी व्यक्ती व अनोळखी गाडीमध्ये न बसण्याच्या सूचना दिल्या यावेळी वडुले गावातील श्री सुरेश आव्हाड मेजर, श्री आजिनाथ आव्हाड, श्री विष्णू आव्हाड, गोकुळ नागरे अमोल आव्हाड यासह सर्व शिक्षक ,विद्यार्थी व गावातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.