शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी, नांदुरा
नांदुरा : शेंबा आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शासनाने आजादी का अमृत महोत्सव अभियान सुरू केले असून त्याचा सांगता कार्यक्रम म्हणून माझी माती माझा देश हे अभियान राबविणे सुरू आहे. त्या अनुषंगाने शेंबा बु येथे 11 ऑगस्ट 2023 रोजी जि. प. केंद्र मराठी प्राथमिक शाळेमध्ये कार्यक्रम घेण्यात आले. सर्वप्रथम माजी सैनिक गजानन खोलगडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर माजी पोलीस नामदेवराव बोरकर व माजी सैनिक गजानन खोलगडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्वांना पंचप्रण शपथ देऊन वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये शिलालेख उभारण्यात आला आहे.सदर कार्यक्रमाला सरपंच नंदकिशोर खोंदले, उपसरपंच जगन्नाथ भोपळे, ग्रामपंचायत सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समिती बांधकाम सभापती प्रवीण भिडे, ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र वराडे, व इतर ग्रामपंचायत सदस्य, केंद्रप्रमुख तथा नोडल अधिकारी म्हणून श्री तरमळे सर, मुख्याध्यापक श्री बालोद सर, शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष किशोर वाकोडे, ग्रामसेवक श्री राठोड साहेब, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष बोरकर, निलेश दाभाडे, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण उद्देश सांगून चहापानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.