राजेंद्र पोटफोडे
ग्रामीण प्रतिनिधी, अमरापूर
अमरापूर: आज शनिवार दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी अमरापूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ११वी व १२वी कला व विज्ञान शाखेच्या पालकांची शिक्षक पालक सहविचार सभा संपन्न झाली.या कार्यक्रमाची सुरुवात कर्मयोगी आबासाहेब काकडे स्व निर्मलाताई काकडे व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम मंगल वावरे यांनी केले तर प्रास्ताविक व अध्यक्षीय सूचना सचिन मरकड यांनी मांडली व त्यास विकास भिसे यांनी अनुमोदन दिले.आजच्या पालक शिक्षक सहविचार सभेला अध्यक्ष म्हणून इयत्ता १२वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु ऋतुजा राम पोटफोडे या विद्यार्थिनीचे पालक कॉम्रेड रामजी पोटफोडे हे लाभले होते.शिक्षक मनोगतामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक ज्ञानेश्वर आवारे यांनी २००८ ला अमरापूर कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना होऊन २००९ ला महाविद्यालय प्रत्यक्षात सुरू झाल्याचे सांगून आत्तापर्यंत एमबीबीएस फार्मसी आर्मी पोलीस व इतर नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची नियुक्ती झाल्याचे अभिमानाने सांगितले.आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपला विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा पाठपुरावा केला पाहिजे तसेच विद्यार्थ्याला घडवण्यामध्ये पालक व शिक्षक यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.पालक मनोगतामध्ये नितीन म्हस्के यांनी शिक्षक व पालक हे विद्यार्थी रुपी रथाचे दोन चाके आहेत, तसेच पालकांनी व्यस्त जीवनातून पाल्यासाठी वेळ काढून पाल्याशी संवाद साधला पाहिजे. तसेच अमरापूर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उत्तम शिक्षण दिले जाते याची प्रचिती आल्याचे त्यांनी सांगितले.विद्यालयाचा माजी विद्यार्थी अनिकेत पोटफोडे या विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवावे व पालकांनी शिक्षकांवर विश्वास ठेवावा असे सांगितले.श्रीम रेखा खैरे यांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चांगली शिस्त लावली जाते तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये एका महिन्यात सकारात्मक बदल झाल्याचे देखील सांगितले.सामाजिक कार्यकर्ते राजू नाना पोटफोडे यांनी पालकांनी शिक्षकांशी संवाद साधणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.तसेच विद्यार्थ्यांना मोबाईलच्या वापरापासून परावृत्त करण्याचे आव्हान देखील केले.तसेच अमरापूर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गणपत शेलार यांनी पालकांनी शिक्षकांशी विचारांची देवाण घेवाण करावी तसेच मुले ही आर्थिक संपत्ती पेक्षा महत्त्वाची असल्याने त्यांची काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे तसेच एफ डी एल संस्था ही गुणवत्तेला प्राधान्य देणारी संस्था आहे असेही स्पष्ट केले. यावेळी प्राचार्य व शिक्षक यांनी पालकांच्या शंकेचे निरसनही केले.यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड रामजी पोटफडे यांनी महाविद्यालयीन वयोगटातील विद्यार्थ्यांकडे पालकांनी बारकाईने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.श्रीम रेणुका वेदपाठक यांनी आभार मानले. या कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.