किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर, यशाची परंपरा कायम राखत यावर्षी सुद्धा विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 100% लागलेला आहे
विद्यालयातून 179 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी प्राविण्य श्रेणीत 108 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 71 विद्यार्थी पास झालेत. विद्यालयातून
प्रथम स्वप्निल गजानन करवते 98.20
द्वितीय अक्षया सुधाकर कवर 96.40
तृतीय केतकी गजानन वालोकार 94.60
*गुण घेऊन विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राखली. कोरोना परिस्थितीवर मात करत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. विद्यालयातून प्रथम आलेला स्वप्नील करवते म्हणाला, “जर परीक्षा झाली असती तर यापेक्षा सुद्धा जास्त गुण मिळविले असते आणि पुढे मला कला शाखेतून शिक्षण घेऊन अधिकारी व्हायचे आहे.” असे मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांचे कौतुक सौ स्नेहप्रभादेवी गहिलोत, सचिव बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर, व्यवस्थापक- विजयसिंह गहिलोत, प्राचार्य-बी एम वानखडे सर ,अंशुमनसिंग गहिलोत ,अजितसिंग गहिलोत, जगमोहनसिंह गहिलोत आणि सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.