सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. १० ऑगस्ट २०२३ बीड जिल्ह्यात बोकाळलेले अवैध धंदे, अवैध हत्यारांची तस्करी आणि या अवैध हत्यारांच्या माध्यमातून जिल्ह्याभरात वाढत जाणारी आणि घडणारी गुन्हेगारी यांमुळे बीड पोलिस प्रशासनावर पुन्हा प्रश्न निर्माण झाला असून जिल्ह्यातील पोलिस प्रशासन चर्चेत आले आहे.बीड शहर आणि जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे बोकाळले असून पोलिस प्रशासन मात्र या घटनांकडे काणाडोळा करत आहे. या घटनांना बीड जिल्ह्यातील पोलिस प्रशासन जबाबदार असल्याचे मत जिल्ह्यातील अनेक भागातील नागरिकांमधून येत आहे. जिल्ह्यात कुठेही पोलिस प्रशासनाचा धाक राहिला नसून जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. जिल्ह्यात वाढत जाणारे खुन दरोडे चोरी महिलांवरील अत्याचार तसेच दिवसाढवळ्या जिल्ह्यात अवैध हत्यारे घेऊन फिरणारे गुंड या हत्यारांच्या मदतीने जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरातील सार्वजनिक ठिकाणी होणारे गोळीबार या सर्व घटनांना जिल्ह्यातील भ्रष्ट राजकारण आणि हतबल झालेले पोलिस प्रशासन जबाबदार असल्याचे जिल्ह्यातील जनतेचे मत येत आहे. बीड शहरातील सार्वजनिक ठिकाणी गावठी पिस्तूल घेऊन दहशत निर्माण करणारे गुन्हेगार आणि जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील कन्हेरवाडी परिसरातील यशराज हॉटेलमध्ये रात्री १ वा. सुमारास गोळीबार करण्यात आला. या पोलिस अधीक्षक साहेब पोलिस प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आणि हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुन्हेगारांमध्ये वाढ तर होतच आहे.पण त्यांचे मनोबल वाढते आहे. तेव्हा जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाने वेळीच अशा गुन्हेगारांना पाठीशी न घालत शिक्षा केली पाहिजे


