अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगांव – अकोला नांदेड या जिल्ह्यांना जोडणाऱ्या महामार्गाचे कामं सध्या प्रगतीपथावर सुरू असून अंतिम टप्प्यात आहे.केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गावरील प्रकल्प मंजूर करण्यात आलेत.त्यापैकी बरेच प्रकल्प पूर्णत्वास आलेले असून काहीची कामे प्रगतीपथावर आहेत.अकोला आणि नांदेड या 202 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गादरम्यान चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजमध्ये सुरू आहेत. मेडशी ते वाशिम या पॅकेज – 2 मध्ये वाशिम-मालेगांव- मेडशी बायपास कामाचादेखील समावेश आहे.जिल्ह्यातील 99 टक्के रस्त्यांच काम पूर्ण झाल.
त्या ठिकाणी कंटदारांच्या चुकीमुळे धूळ उडाली.परिसरातील शेतांमधील उभ्या पिकांचे नुकसान झाले.अनेक अपघात या परिस्थितीमुळे झालेत. काही शेतकरी वर्गाला जमिनीचा मोबदला योग्य मिळाला नाही तर काहींना कोर्टच्या वाऱ्या करा लागल्या. तर काही गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी शासानाने मुघालाई पद्धतीने ताब्यात घेऊन महामार्गाचे काम पूर्ण केले.मात्र याच मार्गावर मेडशी बायपास मध्ये काही फुटाचे अंतर असलेले क्षेत्रा मध्ये आधी महसूल आणि आता वनविभागाला हस्तातरित जमिनीवर राष्ट्रीय प्राधिकरणला ताबा मिळाला नाही आणि तेथे काम अर्धवटच राहले.कोट्यावधी रुपये निधी खर्चून पण शासनाला शासनच जर परवानगी देत नसेल तर देशाचा विकास कसा होईल असा गंभिर प्रश्न जिल्हातील नागरिकांना पडला आहे.
प्रतिक्रिया –
मेडशी मधील वयोवृध्द शेतकरी दिनकरराव घुगे यांची शेती शासनाने त्यांना योग्य मोबदला न देता मुघलाई पद्धतीने ताब्यात घेतली होती.त्यालाच लागून असलेल्या वनविभागा पुढे शासनाने आता गुडघे टेकले – अजिंक्य मेडशीकर (शेतकरी मेडशी)