कृष्णा जाधव
तालुका प्रतिनिधी निफाड
नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेला नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील निफाड तालुक्यातील गोदावरी तीरावर बसलेले कानळद गाव. गावातील युवक इतर शासकीय, खाजगी संस्था, शेती इत्यादी या ना त्या क्षेत्रात कृतिशील आहेत परंतु आज पावतो गावातील एकही युवक सैन्य दलात नव्हता, गावातील हर्षद जाधव यांची सात महिन्यापूर्वी भारतीय सैन्य दलात निवड झाली आणि गावातील लोकांचा आनंद गगनाला मावेना झाला. आपल्या गावचा सुपुत्र देश सेवेसाठी भरती झाल्याने प्रत्येकाची छाती गर्वाने फुगून गेली, कानळदमध्ये प्रथमच सैनिक होण्याचा बहुमान साहजिकच हर्षद ला प्राप्त झाला. देशाभिमान आणि देशसेवेची आवड असल्याने मेहनतीने आणि जिद्दीने हर्षद सैन्यात दाखल झाला सात महिन्यांपासून नातेवाईक आई-वडील भाऊ-बहीण मित्र आणि गावापासून लांब असलेला हर्षद सोमवार दिनांक 7. 8 .2023 रोजी प्रथमतः गावात आला, गावकरी बांधवांनी मोठ्या जल्लोषात हर्षद ची गावातून मिरवणूक काढली. मंगळवार दिनांक 8. 8 .2023 शालेय व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हर्षदला निमंत्रित केले ,प्रवेश होताच विद्यार्थ्यांनी जल्लोषात स्वागत केले,इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी त्याचे औक्षण केले ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत लक्ष्मण जाधव यांनी पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन हर्षद चा सत्कार केला. हर्षद ची आई सौ.सुनिता जाधव यांचा सत्कार शाळेतील शिक्षिका श्रीमती निशा साळवे केला . त्यांचे काका कैलास यशवंत जाधव यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री कृष्णा जाधव यांनी केला. संपत यशवंत जाधव, अलका जाधव यांचाही सत्कार करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक श्री मोरे सर यांनी हर्षद यांच्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली व देशप्रेम सकारात्मक विचार इत्यादी बाबींविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे शिक्षक श्री किरण हसे सर यांनी केले . हर्षद चे प्राथमिक शिक्षक श्री गांगुर्डे सर व श्री.शिंदे सर यांनी देखील हर्षद चे अभिनंदन केले.सदर कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. किरण जाधव, श्री संतोष जाधव, श्री शिवाजी जाधव, श्री सुरेश पारखे, श्री सिद्धेश्वर जाधव, श्री बाळासाहेब जाधव, दत्तात्रय वाघ अंगणवाडी शिक्षिका गीता जाधव मॅडम, खंडाळे मॅडम अर्चना वाघ व ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित होते









