अविनाश पोहरे / चिफ ब्युरो, अकोला
पातुर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा पत्रकार देवानंद गहिले यांच्या वाढदिवसानिमित्त 4जुलै रोजी येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयाचे सभागृहामध्ये एक दिवस कलावंताचा या कार्यक्रमाचे आयोजन अंकुर साहित्य संघ पातूर साहित्य परिवार ,तनिष्का महिला परिवार आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पातूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते
यावेळी सर्वप्रथम अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय सचिव हिम्मतराव ढाळे, अनिक सौदागर, डॉ. उर्मिला केवट यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अंकुर साहित्य संघाच्यावतीने देवानंद गहिले यांना वाढदिवसा निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर एका पेक्षा एक कविता आणि गीते सादर करण्यात आली यामध्ये सर्वप्रथम पातूरचे ज्येष्ठ पत्रकार राजारामजी देवकर यांनी” ये तो सच है कि भगवान है “या गीताचे खूप सुंदर गायन करून मने जिंकली तर अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय सचिव यांनी “बायको चा पाळणा” सादर करून सभागृहांमध्ये प्रचंड टाळ्या घेतल्या त्यानंतर कृष्णराव घाडगे सर यांनी अपंगत्व ही कविता सादर करून त्यांनी सुंदर आईचे त्यामध्ये वर्णन केले आहे आणि आई एक आदर्श व्यक्ती घडविण्यासाठी अविरत कष्ट करते असा असे त्यांनी आपल्या कवितेमधून सादर केला तर संजय गावंडे यांनी “भय” नावाची कविता सादर केली त्यानंतर पातुर चे सुप्रसिद्ध कवी डॉ. शांतीलाल चव्हाण यांनी “पावसा तुझ्यासाठी” ही सुंदर कविता सादर करून उपस्थितांची त्यांनी मध्ये जिंकले तर प्राध्यापक शंकराव गाडगे यांनी मराठी इंग्रजी चा सुंदर मिलाप करताना त्यांनी मनुष्याचे जीवन संघर्षमय आहे पण तरी आत्मविश्वास दृढ असेल तर मनुष्य काहीही करू शकतो साहित्यनिर्मितीसाठी कोणतेही बंधन नाही अशा भावना मांडणारी इंग्रजी आणि मराठीच्या समन्वय साधणारी कविता त्यांनी सादर केली
तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कवी नारायणराव अंधारे यांनी” माणुसकी” ही कविता सादर करून आज समाजातील माणुसकी आहे हरवत चालली आहे याचे सुंदर विश्लेषण करणारे कविता त्यांनी सादर केली आहे त्यानंतर प्रा. विठोबा गवई यांनी महागाईचे वारे ही कविता सादर करून महागाई किती वाढली असून त्याचे काय दुष्परिणाम समाजात मध्ये पडतात याचे विस्तृत वर्णन करणारी कविता त्यांनी सादर केली आहे.
तर युवा कवी रवी घुगे यांनी गझल हा काव्यप्रकार सादर करून प्रेयसी विषयी कवीचे त्यांनी वर्णन केले आहे या आशयाची कविता त्यांनी सादर करून रसिकांची दाद मिळवली आहेत त्यानंतर प्रा. मुनव्वर खान सर यांनी उर्दू भाषेतील विविध मधले सादर केले आणि पुढारी कसा असतो याचे सुंदर वर्णन त्यांनी करून “शाळा कशी असावी “याचे सुद्धा त्यांनी वर्णन त्यांच्या मतले मधून केले त्यानंतर प्रा. मुकुंद कवळकर सर यांनी कभी देवानंद भाऊ गहिले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी कविता सादर केली त्यांच्यातील विविध गुणांचे वर्णन त्या कवितेमध्ये करून देवानंद गहिले यांच्या सेवाभावी वृत्ती बद्दल सुंदर कविता त्यांनी सादर केली त्यानंतर प्रा. प्रकाश खटे सर यांनी” कोठे आहे कोरोना “ही कविता सादर करून सगळीकडे वातावरण हे भयानक झाले आहे व आपण कोणती काळजी घ्यावी अशी माहिती त्यांनी त्यांच्या कवितेतून सादर केली तसेच पातूरच्या सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई गाडगे यांनी सैनिकाचे वर्णन करणारी सैनिका वरील आपल्या आईला लिहिलेले पत्र त्यांनी त्यांच्या कवितेतून सादर केले तसेच नंदू भाऊ ठक
यांनी “घुसमट “ही कविता सादर करून मनुष्यला जीवनामध्ये विविध प्रकारच्या अडचणी येतात त्यामध्ये माणसा माणसाचे नाते दुरावत चालले आहे याचे विश्लेषण त्यांनी त्यांच्या कवितेतून केले आहे तर असणारे कविता त्यांनी यावेळी सादर केली आहे.
कवितांच्या बहारदार पावसानंतर गीतांचा पाऊस पातूरच्या या सभागृहांमध्ये सुप्रसिद्ध गायकांनी पाडला त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार राजाराम देवकर यांनी “ये तो सच है कि भगवान है” गीत सादर केले त्यानंतर प्रा.विठोबा गवई यांनी” दर्दे दिल,” रवी मेसरे, कृष्णराव घाडगे, मेहबूबशाह यांनी “तेरे जैसा यार कहा,” प्राध्यापक करुणा गवळी यांनी सुरेश भट यांची गीत सादर केले ,पंकज पोहरे, आणि शेवटी देवानंद गहिले यांनी “तू इस तरह मेरी जिंदगी मे शामिल है “हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सुप्रसिद्ध कवी देवानंद गहिले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला कवी आणि गायकांनी अतिशय सुंदर गायन करून हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला आहे यामध्ये कोरोणा संसर्गाचे नियम पाळून डिस्टन्स चे पालन करून सदर कार्यक्रम पार पडला आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कोरोना गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन अंकुर साहित्य संघाचे अध्यक्ष कृष्णराव घाडगे यांनी व्यक्त केले.











