राजेंद्र पोटफोडे
ग्रामीण प्रतिनिधी, अमरापूर
अमरापूर: आज दि 1 ऑगस्ट रोजी शेवगाव तालुक्यातील अमरापुर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य गणपत शेलार हे होते. कार्यक्रमाला सुरुवात कर्मयोगी आबासाहेब काकडे,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक तरसे यांनी केले,तसेच संस्थेचे संस्था प्रतिनिधी श्री शशिकांत काकडे यांनी प्रास्ताविक व अध्यक्षीय सूचना मांडली व यास शिक्षिका श्रीम गीता कर्पे यांनी अनुमोदन दिले.विद्यार्थी मनोगतामधे विद्यार्थिनी कु साक्षी धोंगडे कु प्राप्ती डोईफोडे कु राजनंदिनी चौधरी कु म्हस्के विद्या कु.फलके अक्षदा कु माने संपदा कु.वाघमारे सोनाली कु कल्याणी सुसे चि म्हस्के अर्पित आदि विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
शिक्षक मनोगतामध्ये ज्युनिअर विभागाचे जेष्ठ प्राध्यापक ज्ञानेश्वर आवारे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला.तसेच विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक अशोक जाधव यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांना या थोर महात्म्यांची इत्यंभूत माहिती दिली. अध्यक्षीय मनोगत मध्ये विद्यालयाचे प्राचार्य गणपत शेलार यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











