भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव: बोधेगाव येथील आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ फार्मसी या औषधनिर्माणशास्त्र पदविका महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या 104व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये एचबी डिटेक्शन कॅम्प, व्याख्यानमाला,मुलाखत,व्यक्तिमत्व विकास,पोस्टर प्रेसेंटेशन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,यामध्ये महाविद्यालयातील द्वितीय वर्ष विद्यार्यांनी दहिफळ हायस्कूल व आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव येथील सर्व विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन व आरोग्य तपासणी शिबीर कार्यक्रम पार पाडला या कार्यक्रमा करिता प्राध्यापक असिफ शेख,खराद देविदास,नांगरे अश्विनी,आहेर पूजा यांनी काम पहिले तसेच व्यक्तिमत्व विकास व मुलाखत कौश्यल्य या विषयी डॉ कैलास पोटे व डॉ सुनील आढाव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच बेसिक केमिस्ट्री या विषयावर पोस्टर प्रेसेंटेशन कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले याकिता परीक्षक म्हणून प्रा भस्मे प्राजक्ता,प्रा संदीप बडधे यांनी काम पहिले. महाविद्यालयातील प्राध्यापिका कोकाट जयश्री यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयातील ग्रंथालय करिता एक विद्यार्थी एक पुस्तक,व एक विद्यार्थी एक झाड ही संकल्पना अमलात आणली,महाविद्यालयातील बहुतांशी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवून महाविद्यालयास पुस्तके व झाडांची रोपे भेट म्हणून दिली.या उपक्रमाचे प्राचार्य राजेशजी मोकाटे यांनी कौतुक केले.