गणेश ताठे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट: धारोळी वेस चौकीचे बीट अंमलदार तथा पर्यावरण मित्र हिम्मत दंदी यांच्या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते धारुळी वेस पोलीस चौकी येथे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आता अत्यंत काळाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून वृक्षारोपण करून त्याचा संगोपन करणे आवश्यक आहे. अशी प्रतिपादन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुरज गुंजाळ, शहर पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, कदीर शाह, सय्यद अहमद शेख साबीर नासीर शाह, शेख जावेद यांची उपस्थिती होती.











