संतोष भरणे
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निमगाव केतकी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न शिवसेना जिल्हा प्रमुख ॲड.शरदचंद्र सुर्यवंशी साहेब यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन झाले.युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस सुरज सानप यांनी शिबीराचे आयोजन केले.महाआरोग्य शिबिरास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.निमगाव केतकी परिसरासह इंदापूर तालुक्यातील रुग्णांची तपासणी करण्यात आली.सदर शिबीरासाठी डॉ.मिलिंद खाडे(स्त्री रोग तज्ञ)डॉ. अरविंद अरकिले(होमिओपॅथिक तज्ञ)डॉ. प्रतिभा गाडे डॉ. सुश्रुत शहा, श्रीम.आश्लेषा वाघमोडे श्रीम. तृप्ती उबाळे व इतर तज्ञ डॉक्टर व सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.निमगाव केतकी येथील ग्रामीण रुग्णालय येथे शिबीर संपन्न झाले.यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय काळे युवासेना उपलब्ध प्रमुख कुलदीप निंबाळकर विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक खरात गुरुजी, वि.का.सोसायटी संचालक हनुमंत कांबळे सर,महर्षी वाल्मीक रुषी ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बळीराम सूर्यवंशी,वंजारी सेवा संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख शेखरदादा पानसरे, युवासेना उपतालुकाप्रमुख अक्षय पवार योगेश हरिहर,प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र हांगे शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित बामणे,दत्ताभाऊ खुडे, युवासेना तालुकाप्रमुख सचिन इंगळे शहर प्रमुख अविनाश खंडाळे,गोरख ढोले संतोष पांडवे रंजीत खाडे सूर्यकांत खाडे दादासाहेब तोबरे विनायक गायकवाड व शिवसैनिक उपस्थित होते.मोफत आरोग्य तपासणी असल्यामुळे शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.महाआरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या आजारांची तपासणी करण्यात आली.तसेच औषधाचे वाटप करण्यात आले. शिबिरात हृदयरोग,रक्त तपासणी, इसीजी,रक्तगट इत्यादी तपासन्या करण्यात आल्या.