सय्यद जुल्फेखार अली
ग्रामीण प्रतिनिधी बीड
नेकनूर : जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी नेकनूर रुग्णालयाला अचानक भेट दिली असता त्यांना रुग्णालयात कर्मचारी गैरहजर दिसले असता चांगले धारेवर धरून या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यावेळी त्यांनी काही रुग्णांची स्वतःहून तपासणी केली आहे, तर नेकनूर रुग्णालयात रोज कित्येक रुग्ण उपचार घेतात हेही त्यांनी पडताळणी केली. काही कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याने रुग्णांची होत असल्याने डॉक्टर साबळे यांनी रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना वेळेवर हजर राहण्याचे सूचनाही दिल्या.


