विकास खोब्रागडे
जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपुर
चंद्रपुर/- चंद्रपुर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वसुली व दररोज होणारे कलेक्शन थांबल्याने ग्रामीण भागातील पतसंस्था दैनिक अभिकर्ते यावर उपासमारीची वेळ आली आहे. पतसंस्था ची वसुली थांबल्यामुळे पतसंस्था यांनाही आर्थिक चणचण भासू लागली आहे. तात्काळ कर्ज उपलब्ध होत असल्याने अनेक व्यवसाय किंवा शेतकरी पतसंस्थेकडून कर्ज उचलतात कागदपत्रे बघून पतसंस्था लाखो रुपयाचा कर्जपुरवठा करते.दैनिक एजंट मार्फत दररोज पैशाचे कलेक्शन करून पतसंस्था कर्ज वसुली करतात यातूनच एजंटला कमिशन दिले जाते याशिवाय कर्ज ठेवी दामदुप्पट योजना ही पतसंस्थेच्या वतीने सभासदांना दिल्या जातात त्यामुळे व्यवसायात मंदी आली त्यामुळे दररोज होणारे कलेक्शन थांबविले यामुळे एजंट पतसंस्थेच्या आर्थिक गणित कोलमडले त्यामुळे पतसंस्थांना आर्थिक चणचण भासत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागातील पतसंस्था मध्ये दिसत आहे. संस्थे मार्फत अनेक एजंट बचत खाते चालवतात दुकानदाराने दिलेल्या कर्जही दररोजच्या कलेक्शन मधून वसुली करतात यामधून पतसंस्थां कमिशन देत असते.कोरोनाचा उग्र रूप पाहता बाहेर गावातील कलेक्शन घेणे बंद करण्यात आले आहे.आता पतसंस्थेचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत परिणामी विविध पतसंस्था एजंट वर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे
पळसगांव व परिसरातील गावात कोरोनाचा रुग्ण मिळल्याने प्रत्येक्ष बाहेर गावात जाहून कलेक्शन घेणे बंद झाले आहे,दररोज कलेक्शन सतरा हजार रु होत होते आता मात्र फक्त पाच हजार रु चे कलेशन होत आहे,त्या मुळे आम्हला कमिशन कमी प्रमाणात मिळत आहे.
दुमदेव निकुरे
दैनिक अभिकर्ते पळसगांव(पि)


