पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड दि.12 धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट कामे तत्काळ पूर्ण करावे अन्यथा 19 जुलै रोजी हतनूर टोल जवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा नियोजित रेल्वे मार्ग संघर्ष समितीने विभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.भारतीय राष्ट्रीय महामार्ग 52 धुळे सोलापूर या हायवेवर अपघातग्रस्त स्थळावरील उपाय योजना करण्यापूर्वी संघर्ष समितीच्या वतीने अर्धवट कामे पूर्ण झाल्याशिवाय टोल सुरू करू नये. असे पत्र देण्यात आले होते. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यानी लेखी पत्र देऊन काही ठिकाणी कामे सुरू ही केली होती.तसेच आंदोलन स्थगित करावे या यानुसार संघर्ष समितीने समजस्याची भूमिका घेऊन आंदोलन स्थगित केले होते.तेंव्हा पासून राष्ट्रीय प्रताधिकरणाने सुचविलेली औट्रम घाटातील मुख्य टनेलचे काम पूर्ण करावे.कन्नड बायपास जवळ भूयारी मार्ग ,अंधानेर जेहुर प्रमुख जिल्हा येथे भुयारी मार्ग, कन्नड जाणारा रस्ता मकरणपूर पर्यत पूर्ण करावा , हायवेवरचे दिशादर्शक फलक लावण्यात यावे व घाट खड्डे मुक्त करावा. व इतर राहिलेली कामे पूर्ण करावे. इतर कामाबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास 19 जुलै रोजी दुपारी 1 वाजता हतनूर टोल नाक्याजवळ संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.होणाऱ्या दुष्परिणामास हायवे प्रशासन जबाबदार राहील असे ही निवेदनात म्हटले आहे . या निवेदनावर डॉ. आण्णासाहेब शिंदें,डॉ.सदाशिव पाटील,अशोक दाबके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान संघर्ष समितीच्या इशाऱ्याची कन्नड ग्रामीण पोलीसांनी गंभीर दखल घेतली असून आज सोमवार रोजी संघर्ष समितीचे पदाधिकारी व प्रताधिकार विभागाच्या अधिकाऱ्याची बैठक कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात बोलविण्यात आली आहेत.