मधुकर केदार
शहर प्रतिनिधी शेवगाव
शेवगाव : डोंगरे प्राइडचे संचालक शरद डोंगरे यांनी पंढरपूरचा 200 किलोमीटरचा प्रवास सायकलने करून विठ्ठलाचे दर्शन केले.त्यांचे कौतुक म्हणून यश फाउंडेशन अहमदनगरच्या टीमने त्यांचा सत्कार केला.प्रसंगी यश फाउंडेशनचे संस्थापक सचिव संजय डोंगरे, कर्नल डॉक्टर सर्जेराव नागरे, राजूभाऊ बेरड, दूशांत घुले,तेजस जाधव आदी उपस्थित होते. पुढे कर्नल नागरे यांनी आपल्या वक्तव्यामध्ये म्हटले आहे की शरद डोंगरे सारख्या जिद्दी लोकांमुळे येणाऱ्या पिढीमध्ये उत्स्फूर्तता तयार होत आहे. त्यांनी आपल्या भाषणात शरद डोंगरे यांचे भरभरून कौतुक केले.


