रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : नीट ही वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची परिक्षा यामधून केवळ एम बी बी एस च नाही तर बीडीएस, बी एम एम एस, फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग, फार्मसी यासारखे अनेक वैद्यकीय प्रवेश सुद्धा आपणास घेता येतात “निट” परिक्षेच्या निकालानंतर महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे प्रवेश प्रक्रिया की, जी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय संचालनालय मुंबई येथून पार पाडली जाते.प्रवेश प्रक्रियेला सामोरे जाण्यापूर्वी ती, विद्यार्थी व पालकांनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता डॉ.रणजीत पाटील साहेब,माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री अकोला जिल्हा यांनी वैद्यकीय प्रवेश पुर्व मार्गदर्शन कार्यशाळा २०२३ चे आयोजन केले आहे.देशभरात एकच परीक्षा परंतु योग्य मार्गदर्शना अभावी समान गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो सारखेच गुण असताना योग्य तो प्रिफरन्स न दिल्याने एकाला शासकीय तर दुसऱ्याला खाजगी कॉलेज मिळते तर एखाद्याला मॅनेजमेंट कोट्यात सुद्धा ऍडमिशन घ्यावी लागते म्हणून आपल्याला जर योग्य महाविद्यालय निवडता आले तर हा नंतरचा मनस्ताप टाळता येतो.आणि नेमके याच विषयाला घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांनी महाराष्ट्राचे वैद्यकीय संचालक म्हणून कार्य केले आहे व याआधी सुद्धा आपले विनंतीला मान देऊन अकोला येथे येऊन आपल्याला मार्गदर्शन केले असे डॉ. प्रवीण शिनगारे हे अकोला येथे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आपल्या शंकांचे निराकरण करणार आहेत काही प्रश्न असल्यास त्यांची उत्तरे थेट तिथेच सभागृहात देणार आहेत त्यामुळे इतरांचेही समाधान होईल.प्रवेश प्रक्रियेत प्रवेशाचा फॉर्म भरण्यासाठी महाविद्यालय निवडण्यासाठी अनेक पालक हे पुणे-मुंबई येथील खाजगी कौन्सिलर ची मदत घेऊन आपला प्रवेश निश्चित करतात परंतु अनेक होतकरू सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना ते शक्य होत नाही आणि म्हणूनच एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पूर्व मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन गेली अनेक वर्षे सातत्याने करत आहोत व यावर्षी सुद्धा रविवार दिनांक ०२ जूलै २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता प्रभात किड्स स्कूल वाशिम रोड अकोला येथे आयोजन केले आहेकरिता “निट २०२३ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी तसेच विविध कोचिंग क्लास संचालक, विज्ञान कनिष्ठ महाविद्याल चे प्राचार्य, शिक्षक यांनी अवश्य उपस्थित रहावे व या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ . रणजीत पाटील ,माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री अकोला जिल्हा यांनी केले असून, रविवार दिनांक. -०२/जूलै/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता,प्रभात किड्स स्कूल वाशिम रोड अकोला येथे उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.