रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : आषाढ ऐकादशी निमित्त हिवरखेड येथील आर्ट मास्टर वैभव पोटे हे नेहमीच आपल्या हस्त पेंटीगने विविध सणासुदीला संत महात्म्याची पुण्यतीथी, जयंतीला अनूसरुन आपल्या हस्त लीखीत म्हना की रांगोळीने हूबेहूब चिञ काढून .भक्त असो गावकरी की वारकरी आकर्षित करत असतात. आज पंढरीच्या पांडूंरगाची मोठी आषाढी ऐकादशी असुन सगळा महाराष्ट आज विठुमाऊलीच्या नामाची गोडी चाखत आहे. वारकरी सप्रदाय दिंड्या पताका सह पंढरपुरात पायदळवारीने दाखल झाला आहे. प्रत्येकाला त्याच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. अशातच ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता माऊलीच्या दर्शनाची आस लागलेल्या तनाने मनाने थकल्या अवस्थेत आजीबाई वांळवटात थोडासा विसावा घेता विठ्ठलाचा मनपुर्वक धावा करतात. तर पांडूरंग स्वता वारकर्यावर आपल्या भक्तावर प्रेम करतो, असा हा प्रसंग आपल्या भक्त माऊलीला भेटन्यासाठी दर्शनासाठी वाळवंटात पांडुरग स्व:ता आले असे हूबेहूब चिञ वैभव पोटे यांनी भल्यामोठ्या रांगोळीतुन साकारले आहे.

