विद्यार्थ्यांन बरोबर पालकांचा प्रथमच केला सन्मान
संदीप सोनोने
तालुका प्रतिनिधी अकोला
बोरगांव मंजू : मन आणि शिक्षण हे एकमेकांवर अवलंबून असतात.शिक्षणक्षेत्रत्रात अनेक पध्दती शोधल्या गेल्या आहेत व त्या अनुषंगाने अध्यापन पद्धती शिक्षक अध्यापनाचे काम करत आहेत तर विद्यार्थी अध्यन करताना मन हे मोजमाप करण्यासारखे नाही,मन आणि शिक्षण हे एक दुसऱ्यास एकमेकांना पुरक आहेत, मनाची एकाग्रता करून आजच्या गतिमान युगात विद्यार्थी दशेत असताना आपले ध्येय निश्चित करुन स्वताला शिक्षण प्रहवात संपूर्ण पणे झोकून देऊन विद्यार्थ्यांनी प्रगती साधावी असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी प्रा संजय खडसे यांनी केले, स्थानिक संत गजानन महाराज मंदिर सभागृहात आयोजित नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षेत यश संपादन केलेल्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या गुण गौरव सोहळा संपन्न प्रसंगी बोलत होते,दरम्यान आंतरराष्ट्रीय एरोबिक्स फिटनेश फेडरेशन रशियाच्या वतीने एरोबिक्स फिटनेस मध्ये अकरा वयोगटातील जिनमिस्टिक मधून अनय हर्षा राहुल तायडे याला गोल्ड मेडल पटकावलं व बोरगाव मंजू सह राज्याचे नाव सातासमुद्रापार केले, या बद्दल राष्ट्रीय खेळाडू अनय तायडे यांचा उद्योजग ललित अजमेरा , कमल किशोर चांडक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका अध्यक्ष देवानंद मोहोड , अक्षर संस्कार केंन्द्राचे संचालक आदर्श शिक्षक नंदकिशोर दळवी , समर्थ साई अकाडमी चे संचालक आकाश कौशक यांनी शिल्ड देऊन सन्मानित केले.दरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२३ इयत्ता दहावी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी, गणित, विज्ञान विषयात सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले या सह विविध शाळेतील प्रथम क्रमांक पटकावला त्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अक्षर संस्कार केंद्र व समर्थ साई अकॅडमी यांच्या वतीने आयोजित केला होता, दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत गजानन महाराज मंदिराचे विश्वस्त डॉ केशवराव काळे हे होते तर प्रमुख उपस्थित निवासी उपजिल्हाधिकारी प्रा संजय खडसे, आदर्श शिक्षक नंदकिशोर दळवी,प्रा आकाश कौशल आदी उपस्थित होते प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे अध्यक्ष देवानंद मोहोड,संत गजानन महाराज मंदिर यांच्या वतीने गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, या गुणगौरव सोहळ्यात सहभागी विद्यार्थी सह पालकांना सन्मानित करुन पारितोषिक सह पुस्तके भेट देऊन प्रथमच पालकां सह सन्मानित केले,प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक तथा आबालवृद्ध उपस्थित होते. या वेळी संचालन व आभार विकास पल्हाडे यांनी मानले.