दिपक मसुरकर
तालुका प्रतिनिधी रिसोड
रिसोड : दिनांक 26/06/2022 रोजी डॉ. पं. दे . कृ. वि. अकोला. सलग्नित सूविदे फाउंडेशन कृषी महाविद्यालय रिसोड येथे जागतिक अम गवली पदार्थ विरोधी दीन जनजागृती कार्यशाळा घेवून साजरा करण्यात आला. युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निर्देशालय व राज्य शासन सामजिक व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विशेष कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कृषि महाविद्यालय रिसोड द्वारे करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रम करीता अध्यक्ष म्हणून कृषी महाविद्यालय रिसोड चे प्राचार्य डॉ.ए.एम.अप्तुरकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून आर.एस.डवरे विशेष तांत्रीक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड तथा वरिष्ठ कीटक शास्त्रज्ञ केव्हीके वाशीम यांची उपस्थिती लाभली.सदरील कार्यक्रमांचे उद्घघाटन छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन विशेष अतिथी तथा मार्गदर्शक म्हनून लाभलेले प्रशांत जाधव सहा.पोलीस निरीक्षक, विजय अजमेरे पो.उप. निरीक्षक पोलीस स्टेशन रिसोड व त्यांच्या सहकारी यांच्या शुभ हस्ते झाले. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. ए. एम . अप्तुरकर प्राचार्य कृषि महाविद्यालय रिसोड यांनी केली.अमली पदार्थ ओळख व त्याचे दुष्परिणाम यावर विशेष भर देत आर. एस. डवरे विशेष तांत्रीक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड यांनी पी. पी. टी. व्दारे उपस्थीत विद्यार्थ्याना समोपदेश करून मार्गदर्शन केले त्यानंतर अमली पदार्थ व कायदा याविषयी प्रशांत जाधव सहा.पो. नि. यांनी मार्गदर्शन केले.
विजय अजमेरे पो.उप. नी.रिसोड यांनी कायदा, दोषी व्येक्तीस शिक्षा, व विशेष जनजागरण मोहीम संदर्भात विवेचन केले.विद्यार्थ्यांमधून कू.शितल जाधव, कू. वैष्णवी डाबेराव, राहुल जाधव यांनी छत्रपति शाहू महाराज यांचे जीवन चरित्र समाजकार्य विषद करून आज अमली पदार्थ विरोधी दिन निमीत्त स्वतः निर्वेसणी राहू आणि दुसऱ्यांना सुध्दा वेसंनापासून दूर ठेवू असा संकल्प केला. सदरिल कार्यक्रमांचे संपूर्ण सूत्रसंचालन दिपक मसुरकर सहा. प्रा. तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन. एल.बी.काळे सहा.प्रा.शारिरीक शिक्षण विभाग कृषी महाविद्यालय रिसोड यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.सदरील कार्यक्रमासाठी रमेश गोडघासे पोलिस नाईक, रुपेश मस्के पोलीस कॉन्स्टेबल, तथा त्याचे सहकारी पोलीस स्टेशन रिसोड यांची उपस्थिती व सहकार्य लाभले. सोबतच कार्यक्रम यशस्वीतेसाठी संपूर्ण कर्मचारी वृंद कृषि महाविद्यालय रिसोड यांची उपस्थिती लाभली. सदरील कार्यक्रम साठी डॉ.पि.जी.देव्हडे, प्रा. मनोज जाधव प्रा.जी.आर.गोहाडे, प्रा.के.वानखेडे आणि 100 विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली .


