अनंत कराड
शहर प्रतिनिधी, पाथर्डी
पाथर्डी : तालुक्यात पावसाने किरकोळ स्वरूपात हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पेरणीच्या लगबगीसाठी तालुक्यातील खेड्यापाड्यातील शेतकरी वर्ग बियाणे खते खरेदी करण्यासाठी पाथर्डी शहरातील दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे. पाथर्डी तालुका हा दुष्काळी असून सर्व शेती पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. यावर्षी शेतकरी वर्गाचा कल जास्त तुर उडीद कपाशी बाजरी या पिकावर जास्त बियाणी खरेदी वरून पेरणीवर कल दिसून येत आहे.


