सुनिल गेडाम
तालुका प्रतिनिधी, सिंदेवाही
सिंदेवाही: सिंदेवाही पोलीस प्रशासनाने आणखी एक मोठी कामगिरी करीत आपल्या कर्तव्याचा परिचय करून दिला आहे.सिंदेवाही पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांच्या नेतृत्वात काही दिवसापूर्वी पोलीस प्रशासनाने अवैध सुंगाधित तंबाखू जप्त करून कारवाही केली होती.त्यात आणखी मोलाची कामागिरी करत मुक्या जनावरांना कत्तल खाण्यात घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा सिनेस्टाईल पाठलाग करून मुक्या जीवांना जीवदान दिले. सविस्तर वृत्त असे की दिनांक 23/06/2023 रोजी पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण ,पी.एस.आय.सागर महल्ले , पोलीस सहकारी रणधीर मंदारे हे पोलीस स्टेशन च्या परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना,त्यांना अवैध रित्या मुक्या जनावरांची वाहतूक होत आहे.
ही माहिती मिळाली सदर माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन च्या वतीने सिंदेवाही मधील मुख्य मार्गांवर शिवाजी महाराज चौक इथे नाकाबंदी केली व वाहन थांबवून वाहणाची तपासणी सुरु केली. याचं दरम्यान KA 51 AH 1079 नंबर चे वाहन भरवेगात येताना दिसले सदर वाहणास पोलीस प्रशासनानी थांबविण्याच्या प्रयत्न केला पण कॅन्टेनर च्या चालक ने पोलीस प्रशासानाच्या नाकाबंदी ला न जुमनता नाकाबंदी तोडून भरवेगाने समोर निघून गेले, त्यामुळे सदर कॅन्टेनर चा पाठलाग करण्यात आला.हे वाहन सिंदेवाही पोलीस स्टेशनंच्या हद्दीतून मुल पोलीस स्टेशन च्या हद्दीत गेले असता या बाबत मुल पोलीस स्टेशन ला कळविण्यात आले पण मुल पोलीस स्टेशन ची नाकाबंदी लागण्या अगोदरच सदर कॅन्टेनर सावली मार्गाने पुढे जात होता, तरी सिंदेवाही पोलीसाची टीम या कॅन्टेनर चा पाठलाग करीत होते. हे कॅन्टेनर सिंदेवाही पासून मुल खेडी फाटा,चांदापूर फाटा ,जुनसुर्ला , भेजगाव, थेरगाव,देवाडा, सुशी दाबगाव असा प्रवास करीत होता, आणी सिंदेवाही पोलीस टीम सुद्धा या सात्यत्याने कॅन्टेनर पाठलाग करीत होता. कॅन्टेनरचालक यांनी नाकाबंदी तोडल्याची माहिती जिल्ह्यातील मुल, सावली,पोंभुर्णा ,गोंडपिपरी येथील पोलीस स्टेशन ला माहिती देण्यात आली मग या कॅन्टेनरला थांबविण्यासाठी पोलीस स्टेशन उमरी च्या हद्दीतील मौजा डोंगरहळदी गावाजवळ कॅन्टेनर ला थांबविण्यासाठी हायवा ट्रक रस्त्यावर उभा करण्यात आला होता. व पूर्ण पणे नाकाबंदी केली त्यामुळे कॅन्टेनर चालकाला पुढे जाण्याचा मार्ग न दिसल्याने कॅन्टेनर थांबवून चालक वाहन सोडून जंगल व्याप्त परिसरात पळून गेले. सिंदेवाही पोलीस स्टेशन च्या टीम ने फिल्मी स्टाईल ने पाठलाग केलेल्या कॅन्टेनर ची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यात 32 नग बैल किंमत अंदाजे 3,10,000 रु चे मुके जनावर अत्यंत निर्दयतेने कोंबून भरून होते.सदर हे मुके जनावर कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असल्याचे निष्पण झाले.या नंतर या सर्व जनावरांच व कॅन्टेनर चा पंचनामा करण्यात आला.व ही जनावरे मौजा लोहारा येथील गोशाळा मध्ये देण्यात आली. सिंदेवाही पोलीस नी या नंतर कॅन्टेनर अंदाजित किंमत 40,00,000, व जनावरे किंमत 03,10,000,मिळून 43,10,000, रु किंमतीचा माल जप्त करण्यात आला,व सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे अप.क्र. 275/23 कलम प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला सदर कॅन्टेनर सिंदेवाही पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आले. या बाबत पुढील तपास पो.उप. नी.भास्कर ठाकरे हे करीत आहेत. मुक्या जनावरांना कत्तल खाण्यात नेण्यापासून रोखून त्याना जीवनदान देणाऱ्या पोलीस प्रशासन सिंदेवाही यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.