हनुमान बर्वे
शहर प्रतिनिधी वाशिम,
हिंगोली तालुक्यातील मोप या शिवारात पेरणीला सुरुवात. शेतकरी पावस पडण्याची प्रतीक्षा करत होते. शेतकऱ्यांची प्रतीक्षा एक महिन्यानंतर निसर्गाने पाऊस मय वातावरण करून. शेतीतील कामाला सुरुवात बळीराजांनी शेवटी पेरणीला सुरुवात केली. व छोट्या छोट्या मुलांनी शेतातील पेरणी चालू असताना पेरणीला मदत करताना आनंदात आई-वडिलांना मदत केली. पूर्वी बैल जोडीने पेरणी करत असायचे आता तुरळक ठिकाणी बैल जोडी बघायला मिळते. भारता हा कृषीप्रधान देश असून. आता आपल्या देशामध्ये शेतीतील मशागती मशीनद्वारे ट्रॅक्टर द्वारे सर्वात जास्त केली जाते व शेतातील काम हे सर्वात लवकर केल्या जातात. आधी शेतातील पेरणी. नांगरणी. वखरणी. डवरणे. इत्यादी कामे बैलजोडींच्या साह्याने घुंगराच्या आवाजात जोमात बळीराजा करत असायचा पण आता बैलांचा नाद च तुरळक ठिकाणी बघावयास मिळतो.