सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर तालुका ग्रामसेवक संघटनेची बैठक जिल्हा अध्यक्ष अशोकराव बुरूकुल यांच्या अध्यक्षतेखाली मेहकर पंचायत समितीच्या सभागृहामध्ये संपन्न झाली या बैठकीत मेहकर तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली असून तालुका अध्यक्षपदी दत्ता पाटील काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर कार्यकारिणी मध्ये सचिव शेषराव शिंदे उपाध्यक्ष कु अणिता बावने उपाध्यक्ष उमेश शेवाळे सहसचिव एस टी मोरे कोषाध्यक्ष एम आर पाटील संघटक वि आर आंधळे सल्लागार डि टी.तांबारे यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीत सर्व ग्रामसेवक उपस्थित असुन नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्यनां शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी सभागृहामध्ये मला दिलेल्या जबाबदारी चे पुर्ण पणे संघटनेसाठी प्रामाणिकपणे काम करुन पुर्ण पणे संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत राहील.मला दिलेल्या जबाबदारी मध्ये कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असे मत व्यक्त केले
या बैठकीत मध्ये तालुक्यातील सर्व ग्रामसेवक उपस्थित असुन सुत्र संचालन एम आर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर चनखोरे यांनी मानले











