विकास खोब्रागडे
जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर
चंद्रपुर संपुर्ण जगात कोरोना महामारीने तांडव केल्याने संपुर्ण जग होरपळून गेले आहे. याची झळ एक वर्षापासून संपुर्ण भारत भर बसत आहे. भारताची आरोग्य व्यवस्था सुद्धा कोलमडून पडली आहे. कोरोना च्या दुसऱ्या लाटेने तांडव केल्याने अराजकता माजली आहे. कोरोना रुग्णाच्या मृत्यू दरात सातत्याने वाढ होत आहे.आरोग्य कर्मचारी यांच्यावर ताण पडु नये यासाठी चंद्रपुर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपरिषद, खाजगी शिक्षक, ग्रामीण व शहरी भागातील शिक्षक यांच्या वर जबाबदारी सोपविण्यात आली.संपर्कातील व्यक्तीचा शोध घेणे, कोरोना प्रतिबंध जनजागृती, कोरोना बाधित कन्टेंन्टमेंट झोनमध्ये जाऊन प्रत्यक्ष कामे करने आदी जबाबदारी सांभाळीत असतांना शासनाने कोणताही विमा कवच लागु केला नाही. त्यामुळे कोरोना योद्धा शिक्षकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता व आपला जीव धोक्यात घालून कोरोना योद्धा ची जबाबदारी पार पाडीत आहे. परंतु विमा कवच लागु न केल्याने शिक्षकांची कुटुंब उघड्यावर पडण्याची चिन्ह दिसत आहे. ही जबाबदारी पार पाडीत असतांना १५ शिक्षकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. आणी ६५ च्या वर शिक्षकांना कोरोना संक्रमणाची बाधा निर्माण झाली . कोरोना महामारी मुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबांना भिक मागण्याची पा़ळी येऊ नये यासाठी शासनाने तात्काळ ५०लाखाचा विमा कवच लागु करण्याची मागणी ओ .बी.सी .संघटनेचे कवडू लोहकरे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
कवडू लोहकरे यांचे मत
“” शासनाने शिक्षकांच्या जिवाशी खेळु नये. संसार उघड्यावर आहे. बाकीच्या कर्मचारी यांना विमा लागु आहे तर शिक्षकांना का नाही ? शासनाला कोरोना योद्धा व त्यांच्या कुटुंबाची चिंता नाही. “”
कवडू लोहकरे
कोषाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघ चिमुर


