अनिल ठोकळ, जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
कनका : जगासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना माहामारीने थैमान घातले असून. घरी रहा सुरक्षित रहा. विनाकारण घरा बाहेर जाऊ नका. असे आदेश दिले जात आहे. येथील नळयोजनेच्या विहीरीला पाणी कमी पडत असल्याने येथे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तर पाण्यासाठी गावाशेजारी असलेल्या विहिरीतून पाणी आणन्यासाठी महीलांची गर्दी होऊ नये. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतने गावातील कोणीही एकमेकांच्या संपर्कात येऊ नाही म्हणून पाणी टंचाई जाणवत असल्याने महीला पाणी आणन्यासाठी एकत्र येऊ नाही म्हणून गावकऱ्यांना घरपोच टॅंकरव्दारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. गावकऱ्यांना विनाकारण घरा बाहेर जाऊ नका. गर्दी करू नका असे आवाहन केले असता मग पिण्याच्या पाण्यासाठी बाहेर जाण्याची वेळ येऊ नये. म्हणुन दिलेल्या आदेशाचे पालन करीत कनका ग्रामपंचायतने घरपोच पाणी देऊन गावात कोरोनाच्या साखळी तोडणे शक्य आहे असे दाखवून दिले. लॉकडाऊन लागण्या अगोदर कनका येथे कोरोना रुग्णात वाढ झाली होती. मात्र ग्रामपंचायतच्या वतीने गावात नाकाबंदी करुन व विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. महीला एकत्र येऊ नये म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने टॅंकरव्दारे घरपोच पाणी पुरवठा सुरू केला आहे.कोरोनाचे सर्व नियम पाळत टॅंकरव्दारे घरपोच महीला व घरातील कोणत्याच व्यक्तीने घराबाहेर न येता घरपोच टॅंकरव्दारे पाणी दिल्या जात आहे. त्यामुळे सर्व नवनिर्वाचित सरपंच व ग्रामसेवक सदस्य यांचे कौतुक केले जात आहे..


