वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
आलेल्या तक्रारी कडे दुर्लक्ष करणे आणि मोठा अपघात घडला की धावाधाव करणे ही राळेगाव महावितरणच्या कामाची पद्धत होत चालली आहे.मध्यंतरी झाडगाव परिसरात जीवंत तारेच्या स्पर्शाने बैल ठार झाले पण महावितरण आपल्या कामात सुधारणा करण्यास तयार नाही.
त.भा. तालुका प्रतिनिधी मोहन देशमुख यांचे शेतातील तीन विजेचे खांब उन्हाळ्यातील वादळाने वाकले आणि ताराखाली लोंबकळत आहे त्या संबंधीची तक्रार दोन महिण्यापूर्वी केली होती परंतु रितसर विज बील भरणाकरून सुद्धा अजूनही खांब उभे केले नाही.वारंवार पाठपुरावा करूनही महावितरणचे अभियंता गजबे कामासाठी टाळाटाळ करीत आहे.अशी एकच नाही तर अनेक शेतकर्यांच्या तक्रारींना महावितरण वाटाण्याच्या अक्षता लावत आहे त्यामुळे महावितरण मोठ्या अपघाताची वाट बघत आहे की काय अशी शंका उपस्धित होत आहे