वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
कोरोणा महामारी च्या दुसऱ्या लाटेमुळे नगर पंचायत राळेगांव च्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्यात. या आधी अनेक इच्छूकांनी आपापल्या प्रभागात अघोषीत प्रचार सुरु देखील केला होता. मतदारांच्या भेटीगाठी सह सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती,अतिशय मृदु मधाळ वाणी तून संभाषणं याला जेमतेम सुरुवात झाली पण कोरोणा महामारी च्या दुसऱ्या लाटेमुळे इच्छूकांच्या आशेवर पार पाणी फेरल्या गेले आहे….
अनेक नवागंतुक नगर सेवक होण्यासाठी सज्ज झाले आहे.
नगर पंचायत राळेगांव मध्ये सतरा प्रभाग असून यातील दोन प्रभाग अनुसूचित जाती साठी आणि तीन प्रभाग अनुसूचित जमाती साठी आरक्षित आहेत. इतर आरक्षण बहुतेकांच्या पत्थावर पडलं होतं. पण आता संभाव्य निवडणूका ओ.बी.सी.आरक्षण मुद्द्यामुळे कशा काय होईल?याचीच चर्चा सुरु झाली आहे. सध्या आरक्षण आहे तेच राहाणार किंवा परत नव्याने निघणार?या बाबत संभ्रम कायम आहे.
मागील पंचवार्षिक मध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले पण नेतृत्वाला दहा सदस्य सांभाळता न आल्याने म्हणा की पद लालसेपाई भाजपा चे दोन गट पडले. वादविवाद,भांडणं,रुसवे फूगवे,कमीशन साठी कंत्राटदाराच्या मागे मागे धावणे सह दोन वेळा मिळालेली विधानपरिषदेची बिदागी यातच धन्यता मानीत पाच वर्ष संपली.सहा महिने प्रशासक म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी राळेगांव शैलेश काळे हे होते