आमदार डॉक्टर देवरावजी यांच्या प्रयत्नांना यश
राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली – जिल्हा स्टेडियमच्या बांधकामाची कंत्राट प्रक्रिया पूर्ण झाली असून जिल्हा क्रीडा संकुल गडचिरोली येथे विविध सोयी सुविधांचे बांधकामाकरिता (विद्युतीकरणासह) २४ कोटी ३१लक्ष ३ हजार, १९६ रुपयांचे कंत्राट नांदेड येथील मे. कृष्णा इंटरप्राईजेसला मिळाले असून सदर स्टेडियमचे बांधकाम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गडचिरोली जिल्हा स्टेडियमला निधी मंजूर केली होती. सदर बांधकाम मागील दीड वर्षापासून प्रलंबित होते या स्टेडियमच्या बांधकामाकरिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत होते अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने जिल्हा स्टेडियमला प्रशासकीय मंजुरी व निधी उपलब्ध करून सदर बांधकामाचे कंत्राट नांदेड येथील मे कृष्णा इंटरप्राइजेस कंपनीला दिले आहे. त्यामुळे लवकरच या स्टेडियमचे बांधकाम सुरू होणार आहे. आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून जिल्हावासियांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.











