निलेश बा. किरतकार
मुख्य संपादक, अकोला
पातूर : भारतीय प्रजासत्ताक दिन आज संपूर्ण राज्यभर उत्साहाने साजरा केला जातोय. त्यानिमित्ताने अकोला जिल्ह्यातील विवरा येथे जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाळा येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी 8 वाजता रुख्मिणीबाई बोचरे विद्यालय तथा स्व. बेबीताई समाधानराव इंगळे कनिष्ठ कला महाविद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढून देशभक्तीपर नारे दिले. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो च्या घोषणांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. प्रभातफेरी झाल्यावर दोन्ही शाळांचे विद्यार्थी ध्वजारोहनासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे जमा झाले. प्रभातफेरी शाळेत आल्यावर शाळा व्यवस्थापन समिती तर्फे सर्व विद्यार्थी आणि गावकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर पजई तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ. मंगलाताई माणिकराव देठे उपस्थित होत्या. यावेळी सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तसेच यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मनोहर पजई यांनी तर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ. मंगलाताई माणिकराव देठे यांनी केले. सौ. अर्चना चंद्रशेखर राऊत आणि उपसरपंच महादेवराव मेसरे यांनी महामानवांना पुष्प अर्पण केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन केले. त्यानंतर गावातीलच फौजि पुरुषोत्तम लामगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहना नंतर सर्व विद्यार्थ्यांनी ध्वजवंदन करून राष्ट्रगीत झाले. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, तसेच रुख्मिणीबाई बोचरे विद्यालयाचे प्राचार्य , सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. यावेळी क्रीडा, सांस्कृतिक आणि शालेय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आणि आभार प्रदर्शन करून या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. विद्यार्थ्यांना जाताना खाऊ वाटप केले.